चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महासचिव पदी प्रमोद बोरीकर यांची निवड

336

चंद्रपूर- देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि इकडे महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली. जिकडे-तिकडे सर्व राजकीय पक्षातर्फे मोर्चे बांधणीला सुरु झालेली आहे. अशातच चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महासचिव पदी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रमोद बोरीकर यांची निवड करून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली.

चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी प्रमोद बोरीकर यांना महासचिव पदी निवड झाल्याचे पत्र दिले. जिल्हयातील काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करणेसाठी आपला अनुभव नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास सुभाष धोटे यांनी व्यक्त केला.