भावी पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध

156

भावी पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध

ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द, मेंडकी जि.प. शाळेत नोटबुक वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

भावी पिढीच्या अपेक्षा जाणून घेत त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ब्रम्हपुरी येथे आपण स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारला आहे. वर्षभर विविध उपक्रम/ कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत असतो. शाळेच्या आवारातच अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात आपण अजुन काम करणार आहोत जेणेकरून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. या स्पर्धेच्या युगात आपले विद्यार्थी कुठेही कमी पडू नये म्हणून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.