विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत

97

मागील काही दिवसांपासून ब्रम्हपूरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. यात तालुक्यातील मालडोंगरी येथील कमलाबाई मारोती झिलपे व मारोती सिताराम मिसार यांच्या घरांची पडझड झाली. याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते तात्काळ आर्थिक मदत पोहचवुन बेघर झालेल्या दोन्ही कुटुंबियांना आधार दिला.

 

यंदाच्या वर्षी पावसाळा ऋतुचे उशिरा आगमन झाले. तर जूलै महीन्याच्या उत्तराधार्त पडलेल्या मुसळधार पावसाने ब्रम्हपूरी तालुक्यात हाहाकार माजवला. यामुळे तालुक्यात पुरपरिस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर वरील पिके उद्ध्वस्त झाली. तर गावांमधील घरांची सुध्दा नासधूस झाली. काल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार ह्या ब्रम्हपूरी तालुक्यात दौऱ्यावर असतांना तालुक्यातील मालडोंगरी येथील राहत्या घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या घरांची पाहणी करून आर्थिक मदत करीत आधार दिला. व सदर नुकसानीबाबत शासनस्तरावरून लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.

 

यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महिला काॅंग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, माजी नगरसेविका वनीता अलगदेवे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, सरपंच मंजुषा ठाकरे, उपसरपंच विनोद घोरमोडे, माजी सरपंच राजेश पारधी, गणेश घोरमोडे, हिरालाल सहारे, ग्रा.पं. सदस्या भावना गायकवाड, ग्रा.पं.सदस्य माया धोंगडे, विजयदुत निकेश पारधी यांसह काॅंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.