मारेगाव.. विलास झट्टे यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील पाथरी या छोट्याश्या गावचा चार वर्षांपासून तो उपजिविकेसाठी मारेगाव इथे आला.सुरवातीला त्याने ऑटो रिक्षा व्यवसाय सुरु केला.त्यासोबतच त्याने एक छोटा व्यवसाय म्हणून एक छोटेसे बूट हाऊस सुरू केले.त्याला पहिले पासून वाटायचं की आपण पण अभिनय केला पाहिजे.परंतु त्याची आर्थिक परिस्थिती खूप कमजोर होती.तो हे सगळं करू शकत नव्हता.जेव्हा तो मारेगाव ला राहायला आला तेव्हा त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला.सोबतच त्याचा जो छंद होता कलेचा किंवा व्हिडिओ बनविण्याचा तो तीन वर्षांपासून बनवत होता.गेल्या तीन ते चार महिन्यापासून साधा माणूस ही त्याची ओळख आहे.सामाजिक आणि शैक्षणिक ,राजकीय,शेतकरी असे खुप सारे विषय आहे जे समाजातील साध्या सरळ माणसांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर व्हिडिओ बनवत असतो.सोबतच विनोदातुन प्रबोधन कसे करू शकणार यावर तो व्हिडिओ बनवत असतो.मनोरंजनाची आज समाजाला खूप गरज आहे.माझ्यामुळे जर कुणाच्या चेहऱ्यावर हास्य येत असेल तर मी का बरं व्हिडिओ बनवू नये असे त्याने मुलाखतीत सांगितले.व्हिडिओ बनवित असताना त्याला सहकार्य करणारे त्याचे मित्र मिळून त्यांनी नमुने प्रोडक्शन नावाचा एक यू ट्यूब चॅनल सुरू केला आहे.विलास झट्टे नावाची त्याची instagram आय डी आहे आणि तो रिल्स बनवून तो काही ना काही समाजाला देण्याचे प्रयत्न करीत आहे.छोट्याश्या गावचा असल्यामुळे त्याने खूप काही चढ उतार बघितले आहे.व्हिडिओ बनवत असताना अनेक अडचणी सुद्धा आल्या होत्या लोकांनी केलेल्या टीका यांचा सामना करीत त्याने आज ध्येय साध्य केले आहे.आज घडीला त्याला सपोर्ट करणारे अनेक प्रेक्षक वर्ग तयार झाले आहेत व त्याच्यावर खुप प्रेम करतात असे त्याने इंडिया दस्तक न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे….