“गांधी कभी मरते नहीं” चे पोस्टर लॉन्च

366

मुंबई: नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अनुसूचित जाती विभाग काँग्रेसच्या वतीने आयोजित विजय सभेत एक विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अनिरुद्ध वनकर निर्मित आणि दिग्दर्शित हिंदी नाटक “गांधी कभी मरते नहीं” चे पोस्टर लॉन्च करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथल्ला, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री नितीन राऊत, अनुसूचित जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश ललोटिया आणि महाराष्ट्र अनुसूचित जातीचे काँग्रेस अध्यक्ष सिद्धार्थ हतीअंबीरे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते.

20 ऑगस्टला भव्य प्रयोग

या नाटकाचा प्रयोग 20 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 7 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्वसमावेशक असून, नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

गांधींचे विचार आजही प्रासंगिक

“गांधी कभी मरते नहीं” हे नाटक महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या विचारांचे महत्त्व आजही प्रासंगिक आहे हे दाखवून देते. नाटकाचे निर्माता आणि दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी सर्वांना या नाटकास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.