बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील माराईपाटण येथून एक किमी अंतरावर नक्षलवाद्यानी १० आगस्ट १९८९ रोजी कट रचून भ्याड हल्ला केला होता. यात आठ पोलीस अधिकारी, कर्मचारी शहीद झाले होते. त्यांच्या महान बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ पोलीस स्टेशन टेकामांडवा द्वारा आयोजित विविध कार्यक्रमात सकाळी ९ वाजता शहीद स्मारक येथे पोलीस आधिक्षक, मम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी, रवींद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद हुतात्म्यांना सलामी देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी जिवतीचे पोनि राजपुत, गडचांदूरचे पोनि कदम, कोरपनाचे सपोनि गायकवाड, टेकामांडवाचे अभिषेक जंगमवार, भारीचे पोउपनि, गोविंदलवार, पाटणचे सपोनि कोकोडे, वणी कॅम्पचे पोउपनि गव्हारे यांच्यासह इतर कर्मचारी व परिसरातील गावातील नागरिकांची उपस्थिती होती. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. ३६५ दिवस चालणाऱ्या पालडोह, टेकामांडवा व माराई पाटण येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले.
पोलीस आधिक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील नागरिकांचे व पोलीस प्रशासनाचे संबंध वृद्धिंगत व्हावे यासाठी आयोजित भव्य नेत्र शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ८० नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यातील १० जणांना पुढील ऑपरेशन करिता रेफर करण्यात आले. तसेच १० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमास माराई पाटणचे पो.पा.राहुल सोनकांबळे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष यादवराव कोटनाके, ग्रामसेवक धपक्स,मोहुर्ले,सरपंच शशिकला सितू कोटनाके, उपसरपंच विकास सोनकांबळे,शाळेचे मुख्याध्यापक गोस्वामी, सामाजिक कार्यकर्ते, बळीराम काळे,शरद कांबळे, प्रदीप काळे, माझी उपसरपंच प्रल्हाद काळे,सदस्य शीतल मोहन कांबळे,उमेदच्या कॅडर संगीता काळे, प्रियंका काळे व बचत गटातील महिला,पालडोह शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी, टेकामांडवाचे शिक्षक दीपक गोतावळे यांच्यासह विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
प्रास्ताविक जिवतीचे पो.नि. राजपूत यांनी केले. जि.प.पालडोह शाळेतील दोन विद्यार्थिनीसोबत परतेकी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन पोउपनि,अभिषेक जनगमवार यांनी केले.