सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा, संचालित सुशिलाबाई रामचंद्र राव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली,चंद्रपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील समाजकार्य महाविद्यालय व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स, यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 09ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2024उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील समाजकार्य महाविद्यालयात राबविण्यात येत आहे.
दि. 13 ऑगस्ट 2024 समाजकार्य पंधरवडा सत्रातील पर्यावरण संवर्धन कार्यक्रम या उद्दिष्टाला प्रेरक असा कार्यक्रम महिला संस्कार कलश योजना चंद्रपूर यांच्या सहकार्याने महाविद्यलयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सहयोगी पर्यावरण संवर्धन. समिती यांच्या मार्फत राबविला गेला यावेळी
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ.जयश्री कापसे तसेच महिला संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक मा सौं उषाताई बुक्कावार , उपाध्यक्ष कल्पनाताई पलीकुंडवार,संगीता सिध्मसेट्टीवार,सचिव रचिता रेगुंडवार,संध्या विरमलवार, वर्षा आईंचवार,शोभना चेपुरवार रेखा ठक्कर,बहुसंख्य सदस्य भगिनी मोठ्या संख्येने ऊपस्थित होत्या.
समाजकार्य पंधरवड्याचे समनव्य्क प्रा. नितीन रामटेके, सहयोगी पर्यावरण संवर्धन समितीचे समनव्यक प्रा विश्वनाथ राठोड , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा संतोष आडे यांची उपस्थिती होती यावेळी उषाताई बुक्कावार यांनी विद्यार्थ्यांना विनोबा भावे यांच्या विचारधारेच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन सुरु केलेल्या महिला संस्कार कलश योजनेची माहीती देत sनिसर्ग , पर्यावरण आणि समाजकार्यकर्त्याची भूमिका यावर मौलिक मार्गदर्शन केले . पर्यावरण संदेश देत रॅली काढून महिला संस्कार कलश योजने च्या वतीने महाविद्यालयात देणगी स्वरूपातील बगिच्यात बसण्यासाठी देण्यात आलेल्या बेंचेस चे उदघाटन व 50 फुलझाडांचे रोपण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जयश्री कापसे यांनी अतिथीचे स्वागत करून देणगी करीता कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विश्वनाथ राठोड यांनी तर संचालन सुमित काकडे व आभार प्रदर्शन साक्षी अतकरे यांनी केले . यावेळी योजनेच्या महिला सभासद, प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती