*ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात नवीन मतदार नोंदणी व जनजागृती अभियान
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार -: नवीन तथा स्थलांतरित मतदारांना होणार लाभ
जागतिक स्तरावर लोकशाही पुरस्कृत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात नागरिकांना स्वमताने शासक नेमण्याचे अधिकार आहेत. लोकशाहीतून मतदानाचा हा अमूल्य अधिकार देणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी नवीन मतदार, स्थलांतरित मतदार नोंदणी तसेच मतदान यादीतील मतदारांची नावे व इतर बाबींची दुरुस्तीसाठी पुढाकार घेऊ ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये विशेष अभियानाची सुरुवात केली आहे.
मतदान करणे हा आपला संविधानिक अधिकार असून तो लोकशाहीची नीतिमूल्य जोपासण्यासाठी महत्वपूर्ण अधिकार आहे. देशातली लोकशाही कायम राहावी. व प्रत्येकाला आपले मत प्रकट करता यावे तसेच कुणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विशेष अभियान हाती घेऊन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील मतदारांसाठी आधुनिक समाज माध्यमांतर्गत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सदर जनजागृती अभियाना अंतर्गत विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ८३२९६३८७६१ भ्रमणध्वनी क्रमांक सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवून यात नवीन युवा मतदार नोंदणी, तसेच स्थलांतर नवीन क्षेत्रात मतदार नोंदणी व मतदार यादीत अपरिहार्य कारणामुळे नावात बदल किंवा इतर काही बाबींमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास केवळ या व्हाट्सअप नंबर वर “Hi’ पाठवून अगदी घरबसल्या मतदान अधिकार संबंधित सर्व कामे पूर्ण करता येतील. नागरिकांनी या अभियानातून नवीन मतदार नोंदणी स्थलांतरित मतदार नोंदणी तसेच अन्य करावयाच्या दुरुस्ती करून या अभियानाचा पुरेपूर लाभ घ्यावा. असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार तालुका काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी, सावली सिंदेवाही च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.