ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील सर्व नागरिकांना सस्नेह निमंत्रण 🙏

892

ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील सर्व नागरिकांना सस्नेह निमंत्रण 🙏

ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ(जाणी) टेकडी येथे ४५ कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या भव्यदिव्य विपश्यना केंद्र व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करणे या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भंतेजी डॉ.फ्रामहा फोंगसाथोर्ण धम्मभनी,फ्रामाहा सुपाचै सुयानो, कॅप्टन नटीकेट, सिने अभिनेता गगन मलिक, श्री सिद्धार्थ हत्तीअंभिरे खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार प्रणिती शिंदे, खासदार बळवंत वानखेडे, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार शिवाजीराव काळागे, खासदार श्याम बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असणार आहे.

 

तसेच, प्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर यांच्या बुद्ध- भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.