विलास झट्टे यांच्यातर्फे स्वातंत्र्यदिनी शालेय साहित्य वाटप

312

मारेगाव- विलास झटे यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील संगणापूर व रोहपाट येथील शालेय विद्यार्थ्यांच्या नवोदय व स्कॉलरशिपची पुस्तके भेट देत सामाजिक उपक्रम राबविला.

समाजाप्रती संवेदनशील भावना असलेला विलास आज घडीला रिल्सच्या माध्यमातून राजकीय,सामाजिक व्यवस्थेच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेऊन शासनसोबत सामान्य माणसाला जागृत करण्याचे काम करीत आहे.

मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. सोबतच त्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले..