पती -पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या : कारण अजूनही अस्पष्ट गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा येथील घडली घटना

1812

गोडपिपरी:- पत्नीने विहिरीत उडी घेतली. तिला वाचवायला तिच्या मागोमाग पतीने सुद्धा विहिरीत उडी घेतली. या घटनेत पती-पत्नी दोघांच्याही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या पानोरा या गावात काल रात्री 9.30 वाजताचा सुमारास घडली.

प्रकाश शरबत ठेंगणे आणि उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतकांची नावे आहेत. घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली. विहिरीतील दोन्ही मृतदेह पोलिसांनी काढल्याची माहिती आहे. प्रकाश आणि उषा यांच्या तीन महिन्यापूर्वीच आंतरजातीय विवाह झाला होता. मृत्यूचे खरे कारण अद्याप कळले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहे.