वरूर रोड येथील वाचनालयात शिक्षक दिन साजरा…

685

राजुरा:तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर (रोड) येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन् आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शिक्षक दिनाचे महत्त्व काय आहे, याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सिकंदर उराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सिकंदर उराडे,प्रतिष्ठित नागरिक बाबूरावजी कमलवार, वनिता लाटेलवार व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जिवतोडे यांनी तर आभार प्रज्वल बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रवीण चौधरी, स्वप्नील जीवतोडे,प्रज्वल बोरकर,विशाल शेंडे, सागर बोरकर,मयूर जानवे, समीक्षा मोडक, श्रुती बोरकर यांनी सहकार्य केले.