चंद्रपूर : सुशिलाबाई रामचंद्र राव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर येथील एनएसएस व वैद्यकीय मन:चिकित्सक समाजकार्य विभागाच्या वतीने आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 ला महाविद्यालयात स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या ६ व्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व एनएसएस डे साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरा करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,चंद्रपूर येथील डॉ.विराज व समाजसेवा विभागाचे समाजसेवा अधीक्षक श्री तुपेकर व संपूर्ण रक्त संकलन करणारी टीम उपस्थित होती. रक्तदान शिबिराच्या आधी समाजसेवा अधीक्षक श्री तुपेकर यांनी रक्तदान करण्याबाबतचे महत्त्व व रक्तदान कोण करू शकतात रक्तदानाची का आवश्यकता आहे याबाबत मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष आडे यांनी केले अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य(प्रभारी) डॉ. जयश्री कापसे यांनी रक्तदान व देहदानाबाबत चे उदाहरण देऊन रक्तदान व देहदनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये एनएसएस चे अधिकारी प्रा. संतोष आडे नौडल अधिकारी डॉ. ममता ठाकूरवार तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ संजीव निंबाळकर एन एस एस चे सह समन्वयक प्रा. विश्वनाथ राठोड व वैद्यकीय मन :चिकित्सक समाजकार्य विशेषीकरणाचे विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र बोरकुटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित बक्षी व आभार विघ्नेश देशमुख यांनी मानले या कार्यक्रम व रक्तदान शिबिरात संपूर्ण विद्यार्थ्यांनी सहकार्य केले व रक्तदानही केले तसेच या कार्यक्रमाकरिता संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Home Breaking News स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या ६ व्या स्मृति दिनानिमित्त रक्तदान व एनएसएस डे...