दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार… गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील घटना

1923

गोंडपीपरी: सोमणपल्ली येथे एका दुचाकीने ५० वर्षीय महिलेवर जबर धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव सूनंदा सुधाकर चुधरी आहे.

२८ सप्टेंबर रोजी, सूनंदा चुधरी शेतात काम करून संध्याकाळी सहा वाजता घरी परतत असताना अज्ञात दुचाकीने तिला धडक दिली. धडक लागल्याने तिच्या डोक्यासह इतर अवयवांना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे ती रक्तस्त्रावाने व्यथित झाली.

घटनेची माहिती मिळताच धाबा उप पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.