प्रितम म गग्गुरी(उपसंपादक)
आल्लापल्ली :- आलापल्ली येथे रविवारी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. आलापल्ली येथे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांचे स्वागत आदिवासी पारंपरिक नृत्य ढोल ताशांचा गजरात फटाक्याच्या आतिषबाजीने सार्वजनिक विश्राम गृह पासून ते क्रिडा संकुल पर्यंत भव्य रॅली काढुन करण्यात आला. क्रिडा संकुल येथे भव्य असे सभा मंडपात हजारो संख्यात जनता उपस्थित होती.
आयोजित मेळाव्यास गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस आदिवासीं सेल जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, भानय्या जंगम, महीला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर,सगुणा तलांडी,सोनाली कंकडालवार,सुरेखा आत्राम,सुरेखा गोडशेलवार, डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, सतिश जवाजी, गंपावर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा आपल्या शैलीतून खरपूस समाचार घेतला.एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून बहिणीची लूट करून सुरू आहे दुसरीकडे कोट्यावधींची जमीन अदानीला विकता, राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात हातभार लावता,अशा निर्दय आणि निष्ठूर सरकारला आगामी निवडणुकांमध्ये जनताच धडा शिकवेल, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्न औषध प्रशासन मंत्राच्या क्षेत्रात लाखो रुपयांचा सुगंधी तंबाखू, गुटखा सापडतो आणि कारवाई होत नाही. राज्यात कायदा असा राबवला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ घरात सत्ता राहावी म्हणून मंत्री आत्राम व त्यांच्या मुली मध्ये राजकीय द्वंद हे सुनियोजित आहे, अशी टीका केली. अहेरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून राजघराण्यापेक्षा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी भाषणातून अनेक नेत्यांवर टीका केली. काका पुतण्या एकीकडे आणि आम्ही एकीकडे… या भागात आरोग्य सेवा खालावली आहे या परिसरातील पेशंटला खाटेवर आणावे लागते अशी परिस्थिती या भागात आहे हे सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात आता राजघराण्यातून सत्ता काढायची आहे. आमच्या काँग्रेसला सीट मिळाली तर या भागाचा नक्कीच विकास होऊ शकते एकीकडे लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये दिले आणि दुसरीकडे एका लिटरच्या खाद्य तेल मागे 35 रुपये वाढ केली कसली लाडकी बहीण योजना असे टोमणे मारले. एवढेच नव्हेतर येत्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
लोकसभेत दाखवलेली जागरूकता आणि संविधान वाचविण्यासाठी दिलेला लढा हीच काँग्रेस पक्षाची ताकद असून आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करावे असे आवाहन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले. तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्षेत्रातली जनतेच्या समस्या मांडल्या. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व कविता मोहरकर यांनी जिल्ह्यांतील कार्यकर्ता व पदाधिकारी यांना काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागळ पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाकरिता गडचिरोली अहेरी विधानसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
या भाषणामध्ये खासदार डॉक्टर नामदेव किरसाण म्हणाले आम्ही बारा हजार मताधिक्यांनी जिंकून आलो होतो त्यामुळे या भागातला आमदाराचा सीटचा दावा काँग्रेसचा आहे या राजघराणे ही सीट सोडण्यास तयार नाही मागच्या तीन वर्षापासून आष्टी ते अल्लापल्ली रोड चे दयनीय अवस्था झालेली आहे संपूर्ण तालुक्यातील रस्ते खराब झालेले आहे मी निवडून आल्यानंतर संसदेमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित केले या भागातील रोड रस्त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले नितीन गडकरी यांना सुद्धा भेटलो आलापल्ली विश्रामगृहामध्ये नॅशनल हायवे विभागातील अधिकाऱ्यांना बोलवून कुठले अडथळे निर्माण होत असेल तर मी सहकार्य करणार असे सांगितले आमचा उमेदवार निवडून आणणार हे नक्की. अजय कंकडालवार म्हणाले. आजच्या जनसमुदाय रोजी ने आणलेले नाही हे काँग्रेस प्रेमी आहेत या भागात काँग्रेसला दाबण्याचे प्रयत्न हे राजघराणे करत आहे आम्हाला काँग्रेसचा उमेदवार द्यावा आम्ही शंभर टक्के निवडून आणणार. या सभेत विरोधी पक्ष नेते विजय भाऊ वडेट्टीवार, खासदार डॉक्टर नामदेव किरसाण, माजी जि. परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, हनुमंत मडावी, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, सगुना तलांडी, कविता माहुरकर, महेंद्र ब्राह्मणवाडे, सोनाली ताई कंकडालवार, मुस्ताक हकीम, अजहर पठाण, अरुण बेझलवार, अशोक आईंचवार, प्रशांत आईंचवार, बनाय्या जंगम काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.