महात्मा गांधी जयंतीनिमित्याने स्थानिक विकलांग सेवा संस्थाच्या वतीने भेटवस्तू व शिलाई मशीन वितरण

128

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक)

चंद्रपूर – स्थानिक विकलांग सेवा संस्था चंद्रपूरच्या वतीने एका गरजू एकल महिला लता पुनवटकर यांना स्वयंरोजगारासाठी एक नवीन शिवणयंत्र चंद्रपूर काँग्रेस आयचे कार्यकर्ते तसेच अवंति अंबर प्रतीष्ठान संयोजक श्रीमान महेशभाऊ मेंढे यांचे शुभ हस्ते तसेच विद्या निकेतन शिक्षिका प्रीती शंकर देवतळे ,गुणवंत कामगार देवराव कोंडेकर ,नंदा बिहाडे यांच्या उपस्थितीत भेटवस्तु व शिलाई मशीन प्रदान करण्यात आली.याप्रसंगी दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या वतीने दिलेल्या कल्पवृक्ष म्हणून गणलेल्या नारळाच्या झाडाचे रोपण करण्यात आले.

तसेच शिवभोजन लाभार्थी बांधवाना मुंबईच्या महानिर्मिती कपंनीचे कर्मचारी मुख्य लिपिक प्रथमेश किशोर पालवे यांनी शताब्दी मानव व अजरामर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्याने मिठाई वितरण सहयोग तसेच विज निर्मिती कंपनीचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता नागपूर यांनी शिवणयंत्र वितरणसाठी आर्थिक सहयोग दिला.
हा विधायक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा पान्हेरकर, शंकरराव देवतळे, राजश्री शिंदे, माया दुपारे यांनी सहकार्य दिले.