राजुरा: राष्ट्रीय सेवा योजना, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे देण्यात येणारा २०२३-२४ चा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट रासेयो महाविद्यालय पुरस्कार
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास दादाजी बलकी यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ राजमोहम्मद खेरानी, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, डॉ सारिका साबळे यांनी स्वीकारला.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर हा पुरस्कार आणि सन्मान कार्यक्रम अधिकारी प्रा. बलकी, इतर सहायक कार्यक्रम अधिकारी तसेच रासेयो स्वयंसेवकांनी मागील तीन वर्षात हाती घेऊन पूर्णत्वास नेलेल्या विविध उपक्रमाचे फलित आहे, हा सन्मान महाविद्यालयासोबतच प्रत्येक सक्रिय स्वयंसेवकांचा ही आहे असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ वारकड यांनी काढले. यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मिलिंद बारहाते, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरु डॉ प्रशान्त बोकारे, प्र- कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, रासेयो संचालक डॉ श्याम खंडारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी यांनी मागील तीन वर्षातील म्हणजेच २०२१-२२,२०२२-२३,२०२३-२४ या कालावधीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव व राष्ट्रभक्ती जोपासणारे अनेक उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून हाती घेतले.
प्रा. बलकी यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय विविध शिबिरात भाग घेतला, यामध्ये राष्ट्रीय एकता शिबिरात सहभागी झाले. बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र अशा विविध राज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाविद्यालय व गोंडवाना विद्यापीठाचे व राज्याचे नावलौकिक केले, सोबतच राज्यस्तरीय विविध शिबिरातही सहभागी झालेत, प्रा. बलकी यांनी ही राज्याचे नेतृत्व करत राष्ट्रीय, राज्यस्तरीय शिबिरात संघनायक म्हणून महाराष्ट्राचा संघ, विद्यापीठाचा संघ घेऊन सहभाग घेऊन विविध उपक्रम राबविले व महाराष्ट्र राज्याचा व गोंडवाना विद्यापीठाचे नावलौकिक केले.
सोबतच दरवर्षी विशेष शिबिराच्या आयोजनांतून ग्रामीण भागात जनजागृती चे कार्य सुरू आहे, या सर्व उपक्रमाची दखल घेत या पुरस्कारासाठी प्रा. बलकी आणि श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर ची निवड करण्यात आली होती.
मागील तीन वर्षांच्या रासेयो प्रवासात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे रासेयो संचालक प्रा. डॉ. श्याम खंडारे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ खेरानी, संस्थेचे संचालक मंडळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील रासेयो सहकार्यक्रम अधिकारी डॉ सारिका साबळे, रासेयो समितीचे सदस्य डॉ चेतना भोंगाडे, प्रा. विठ्ठल आत्राम, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री अनिल बावणे, श्रीमती लताबाई बोबडे तसेच महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी, शिबिराच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका असलेले मंगी बू. व सुब्बई येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद गावातील नागरिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाविद्यालयातील आजी/माजी रासेयो स्वयंसेवक या सर्वांची या राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराच्या प्रवासात मदत व सहकार्य मिळाले.