बळीराम काळे,जिवती
जिवती (ता.प्र.): तालुक्यातील परमडोली येथील ज्येष्ठ महिला रतनबाई किसन इंगळे (७०) यांचे दिनांक ०४ ॲक्टोंबर २०२४ ला सायंकाळी ०७:१५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहते घरी परमडोली येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
रतनबाई किसन इंगळे (७०) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या परिवारावर ,नातेवाईक व मित्रमंडळीत शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक ०५ ॲक्टोंबर २०२४ रोज शनिवारला दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास जड अंतःकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शकडो नागरिकांनी अखेरचा निरोप देऊन,त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य ,तीन मुली, सात मुले, सूना व नातवंडे नातु असा बराच आप्त परिवार आहे.