भोई समाज आलापल्ली/ नागेपली तर्फे कोजागिरी व युवा संघटनेची कार्यकारणी तयार करण्यात आले

252

प्रितम म गग्गुरी(उपसंपादक)

आल्लापल्ली:- दिनांक १९/१०/२०२४ रोजी आल्लापल्ली येथील भोई समाज आलापल्ली/ नागेपली तर्फे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये ऋषी वाल्मिकी यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते तर यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित..या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम पी मदने तसेच उदघाटक श्री धनंजय कांबडे सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून विजय काडबाजिवार सर, अर्जुन दाते , मल्लेश गगुरी,श्री मानकर सर तसेच संचलन व प्रास्ताविक श्री दिवाकर मादेशी सर केले. यावेळी अर्जुन दाते सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या या समाजाला कसे पुढे न्यायचे आपल्या मुलांना पुढे नेण्या करिता त्यांना कसे मार्गदर्शन करायचे या बदल त्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी युवा संघटनेची कार्यकारणी तयार करण्यात आले व मागील दोन वर्षातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले. त्याच प्रकारे आल्लापल्ली नागेपल्ली नाविन युवा कार्यकारणी तयार करण्यात आले व जानेवारीतील महिलांचे मकरसंक्रात कार्यक्रमाचे नियोजन तसेच लगेच स्नेहभोज करण्यात आले.

त्यानंतर महिला/ पुरुषांचे खेळ व बालकांचे खेळ सुद्धा घेण्यात आले यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग दिले. व लगेच दुध प्राशनचा कार्यक्रम आटोपण्यात आले. अश्या प्रकारे आल्लापल्ली नागेपल्ली भोई समाजाचे कार्यक्रमाचा यशस्विते साठी किशोर कामथे, दशरथ नाने, विजया बोलेवार, सीता टेकुलवार, कोमल कामठे,जितेंद्र जिलेला, नरेश मादेशी, रूपेश बोरे, रत्नाकर नागपुरे, संतोष लोळेलीवार, प्रीतम गगुरी, प्रथम नागपुरे, मयंक कामठे, सरते शेवटी आभार प्रदर्शन. दिवाकर मादेशी यांनी मानले.