बल्लारपूर, १२ नोव्हेंबर २०२४: सध्या राज्यभर निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, विविध पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी सभांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंग रावत यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथील प्रचारसभेला मोठा प्रतिसाद मिळाला.
या सभेला संबोधित करत असताना, महाविकास आघाडीचे समर्थक संदीप गड्डमवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. गड्डमवार यांनी सवाल केला, “सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विकासासाठी काय केले? नुसते झाडे लावणे आणि इमारती बांधणे ह्याला विकास कसे म्हणता येईल?” त्यांनी इशारा दिला की, “बेरोजगारांना उद्योग मिळवून देणे, नवीन रोजगार संधी निर्माण करणे हेच खरे विकासाचे काम आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार स्वतःला ‘विकास पुरुष’ म्हणवतात, पण त्यांच्याकडून एकही ठोस विकासकार्य दाखवावे अशी अपेक्षा आहे.”
संदीप गड्डमवार यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत पुढे सांगितले की, “आपण एकत्र येऊन संतोषसिंग रावत यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात प्रचंड बहुमताने निवडून आणले पाहिजे.”
कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते, ज्यात अनु. जातीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनय बोधी, नागपूर जिल्हाध्यक्ष गवडी, माजी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र डोंगरे, प्रीतम खोब्रागडे, सुदेश भालेराव रमेश मांडे गणेश साळवे संध्या ताई गेडाम अरुणाताई भांडेकर चेतन बोनगिरवार योगेश क्षीरसागर प्रफुल मध्ये विठ्ठल उपरे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
ही सभा महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपा व महाविकास आघाडी यांच्यात तिखट मुकाबला होण्याची शक्यता आहे.