गोंडपीपरी :तालुक्यातील चेक दरुर येथील शेतकरी शांताराम राऊत यांच्या शेतशिवारातील धानाच्या ढिगाला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना ताजी असतानाच परत २७ नोव्हेंबरचां मध्यरात्री संगीता राऊत यांच्या धाणाचा ढीगाला अज्ञात इसमाने आग लावली आगीत संपूर्ण धानाचा ढीग जळून राख झाल्याची घटना घडली आहे. अज्ञाता विरोधात गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सलग पाच दिवसांत दोन शेतकऱ्याचे धानाचे ढिगारे जाळल्याने शेतकऱ्यांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे.आपलाही ढीग जाळला जाईल या भीतीने कुडकुडत्या थंडीत शेतकरी शेतात जागल करू लागले आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे .शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची उपजीविका चालवली जाते. कधी ओला दुष्काळ,तर कधी सुखा दुष्काळ,पुर परिस्तिथी यामुळ शेतपिकाचे मोठे नुकसान होत असते. अशाही परिस्तिथीत शेतकरी पिक वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येते. असे असतानाच चेक दरूर येथील शेतकरी शामराव राऊत यांनी चार एकर शेतात धान पिकाची लागवड केली. धान पीक पूर्णत्वास आल्याने त्याची कापणी करून मळणीसाठी शेतातच धानाचा ढीग तयार केला अशातच दि. 23 नोव्हेंबर च्या रात्री अज्ञात इसमाने धान्याच्या ढगाला आग लावली.अश्यातच आता संगिता राऊत यांच्या धानाचा ढीग जाळल्याने दोघा बहीण भावांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळच्या सुमारास शेतात जाऊन पाहणी केली असता आगीने संपूर्ण ढिक जळून राख झाल्याचे दिसताच महिला शेतकऱ्याचे डोळे पाणावले.
वर्षभर शेतात राबून हाती लागणारे धान्य अज्ञात इसमाने आग लावून जाळल्याने शेतकऱ्याने गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली . पुढील तपास गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तिगोटे करीत आहेत.
बॉक्स:
गोंडपीपरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.शेतीतून निघालेल्या उत्पन्नावर ९० टक्के कुटुंब जीवन जगत असतात.निसर्गाच्या लहरीवर फटका शेतपिकांना बसत असतो. अशा परिस्थितीत शेतकर्याना पिकवाचविण्यासाठी धडपड करावी लागते .असे असतांना देखील अज्ञात माथेफिरू ने धानाचां ढीगाला आग लावली.त्यामुळं संपूर्ण ढीग जळून राख झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळं प्रशासनाने मदत कारवाई अशी मागणी केली जातं आहे.