बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची पोटाची खळगी भरण्यासाठी मोल मजुरी करून अनेक आपले परिवाराचे उदरनिर्वाह करीत असतात.परंतु माराई पाटण येथील मुख्य चौकात ३५ ते ४० वर्षाचे तरुण यूवक यांनी चक्क नंदीबैलास त्याचे चारही पाय त्या तरुणाच्या मांडीवर ठेवून उभा राहिला.व त्यास ढोलकीच्या तालावर मांडीवर नाच करून उपस्थितांचे समोर करून दाखविला. आणि बैलाच्या तोंडात आपली स्वतःच मान दिली.
ही वस्तुस्थिती अक्षरशःचिंताजनक होती.ती कसरत अत्यंत शिताफीने करून दाखवली.यासह त्या तरुण युवकाने बऱ्याच प्रमाणात जीवघेण्या कसरती करून उपस्थितांचे समोर दाखविल्या. हे दृश्य पाहायला जमलेल्या नागरीक व महिला , यंग जनरेशन यांचे चक्क हृदय धडधडत होते.आणि यांच्या या कौशल्यामुळे सर्वच थक्क झाले.