राजुरा: बल्लारपूर वेकोली अंतर्गत सास्ती रामनगर परिसरात डिझेल चोरी करण्यासाठी आलेल्या युवकाजवळ देसी कट्टा व काडतुस आढळल्याने खळबळ उडाली. राजूरा पोलीस गस्तीवर असताना ही घटन दिनांक 24 डिसेंबरला घडली. यात अरोपी लवकुश उर्फ उमेश निषाद (वय 22 वर्षे) याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
कोळसावर डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस गस्तीवर असताना गुप्तचरांच्या माहितीनुसार दोन युवक देशी कट्टा घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व सास्ती रामनगर जवळील एका बंद पान ठेवल्याजवळ संशयित युवकांना पकडले . यात उमेश निषाद या आरोपीला पोलिसांनी पकडले. धर्मा निषाद हा आरोपी फरार झाला.
त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ लोखंडी धातूची देसी कट्टा मिळाला. व पितळी धातूच्या काळतुस मिळाले. अंदाजे 5 हजार शंभर रुपयाचे ऐवज जप्त करण्यात आला. सदर आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत ,कलम 3 /25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन मुक्कामा ,अतिरिक्त पोलिसात अधीक्षक रीना जनबंधू ,उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पवार,पांडुरंग हाके, संदीप बुरडकर करीत आहेत.