वरोरा: आज दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी वरोरा तालुका येथील भारत भूषण मालवीय माध्यमिक विद्यालय नगर परिषद वरोरा माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांनी वीस वर्षानंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यालयातील सन २००३- ०४ या वर्षातील माध्यमिक विद्यार्थ्यांचा स्नेह सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ.प्रतिमा पुरी ,प्रमुख पाहुणे श्री.विशाल साटोणे,श्री.भास्कर ठमके, श्री.चंद्रभान शहारे सर, श्री.ओमप्रकाश निमेकर,सौ.विजया राऊत, श्री.बुट्टे ,सौ.गझलवार कु.बोढे,कु.पेचे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलाने व थोरपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा शाल,पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दिवंगत मित्रांना व शहीद सैनिक अक्षय निकुरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . या कार्यक्रमात शिक्षकांनी व माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. तब्बल वीस वर्षानंतर शालेय जीवनातील मित्र मैत्रिणीची भेट झाल्याने सगळ्यांचा चेहरा आनंदाने फुलला होता. शेवटी सध्या कोण ,कुठे राहतो ,काय करतो ,कोणत्या पदावर आहेत या सर्व चर्चा गप्पांमध्ये रंगल्या. कार्यक्रमाकरिता सर्व विद्यार्थ्यांनी रक्कम जमा केली होती त्यातून सर्व खर्च केला गेला.तसेच माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आजच्या स्नेह मेळाव्यात चविष्ट असे स्नेहभोजन देण्यात आले . शेवटी एक संस्मरणीय तास म्हणून माझा वर्ग माझ्या आठवणी म्हणून शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना शिकवले तसेच आठवणींना सुगंधित करणे हेतू माजी विद्यार्थ्यांमार्फत जुने खेळ खेळण्यात आले शेवटी मित्रांसोबत जुन्या आठवणींचा सुख-सवाद म्हणून मनमोकळ्या अशा गप्पा रंगल्या.यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी पातालबंशी,प्रास्ताविक सुषमा क्षीरसागर आणि आभार प्रदर्शन रमेश जायनाकर यांनी केले.या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी राहील शेख, रीदा शेख ,रमेश जायनाकर,सचिन ठमके,वीणा चौधरी,सुषमा क्षीरसागर,राखी पातालबंशी,अर्चना कोरडे,विजया चिंचोलकर,मंगला मेश्राम, अमजत पठाण,आमिर पठाण,संघमित्रा खैरे,सारिका आत्राम,राहुल खिरटकर,रोशन लोटे,संगीता लोडे,शीतल मगरे,संगीता इंगोले,रोशनी उईके,संगीता क्षत्रिया,हरीश मेश्राम,चंदा भडके ,अन्सार शेख,इंदिरा ढेंगळे , खालिक शेख,वंदना बल्की,प्रीती रामटेके,शीतल नन्नावरे,सरिता क्षीरसागर,सुनीता देऊळकर,विवेक पारखी,प्रीती ताकसांडे,पवन कामडी,यशवंत गायकवाड,शंकर गायकवाड,राजू कुळसंगे उपस्थित होते.