- विरुर स्टे: आदर्श श्री.गुरुदेव सेवा भजन मंडळ व समस्त ग्रामवासीय यांच्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्य विदर्भ व तालुकास्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा दी १८,१९,२० जानेवरी २०२५ रोजी घेण्यात आली त्यात १८ तारखेला सकाळी ६ वाजता आदर्श श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ व वाकिंग ग्रुप चे सर्व सदस्यानी मिडून ग्राम स्वछता अभियान रबाविले व दुपरला २ वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळा तर्फे कार्यकर्ता मेडावा घेण्यात आला. त्यात कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी मा.श्री मोहनदासजी मेश्राम (तालुका सेवाधिकारी गु.से.मं ता.राजूरा ) प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री विजयजी चिताडे ( जिल्हा संघटक ) प्रमुख वक्ते मा.श्री मारोती सतपुते, मा.श्री प्रकाशजी उरकुंडे, मा.श्री जहीर खान सर, मा.श्री शैलेशजी कावळे, मा.श्री देवीदासजी वांढरे इत्यादिनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्या नंतर सा.६ वाजता आदर्श श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ च्या वतीने समुदाईक प्रार्थना घेण्यात आली आणी लगेच उद्धघाटन सोहळ्याला सुरवात करण्यात आली कार्यक्रमचे उद्धघाटक म्हणून मा.डॉ.श्री किशोरजी नामदेवजी कवठे व कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी मा.श्री संतोषजी वाकडे ( ठानेदार विरूर स्टे ) प्रमुख पाहुने म्हणून मा.श्री अनिलजी आलाम ( सरपंच विरूर स्टे ) मा. सौ प्रीतिताई प्रशांत पवार (उपासरपंच विरूर स्टे ) तथा समस्त ग्रामपंचायत सदस्य मा.श्री अविनाशजी जाधव, प्रभाकरजी ढवस, अजयजी रेड्डी, सुरेशजी पावडे, अविनाशजी रामटेके, डॉ उमप साहेब, सतीशजी कोमरवेल्लिवर, डॉ राहुलजी लांडे, कु. प्रियंका पिंपळकर, सौ सरिताताई अजयजी रेड्डी, जीवनदासजी नारनवरे, भाषकरजी शीडाम, भामरावजी पाला, मनोजजी सारडा,गजानजी कोडगिरवार, संजयजी उमरे, तिरुपतीजी नल्लाल्ला, सचिनजी उलमाले, सुनीलजी मोरे, धनोरकर सर, चंद्रशेखरजी उपलंचीवर, रामलू सर, टोंगे सर, रामचंद्रजी पाला सर इत्यादि उपस्तिथ होते त्यात उद्धघाटक,अध्यक्ष्य व प्रमुख पाहुन्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्यानंतर जेष्ठ भजन मंडळी, मा.श्री शंकरजी मोरे,प्रभाकरजी कडुकर,नामदेवजी ठमके,गोपड़रावजी ठमके, शंकरजी एरोजवार,भाष्करजी शीडाम, विठोबाजी खोबरे, प्रभाकरजी गचकेश्वर, यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच व्यापारी मंडळीचाही सत्कार करण्यात आला.
मा,श्री पंकजजी उपलांचीवार यांचे कडून ३ दिवसीय भजनस्पर्धे कारिता अन्नदान करण्यात आले, भजन स्पर्धेकारिता परीक्षक म्हणून मा.श्री गोपालसरजी सालोड़कर व मा. श्री निखिलसरजी मड़ावी हे लाभाले. भव्य अशा भजन स्पर्धेत एकूण ४१ मंडळानी सहाभाग घेतला त्यात पुरुष गटात प्रथम क्र. सार्थक भ.म.मंडळ (हस्तापुर) २) आदर्श गुरुदेव भ.म.मंडळ निमगव्हान ३) राष्ट्रसंत भ.म.मंडळ जनोना ४) अखिलभारतीय गुरुदेव सेवा भ.म.मंडळ हीरापुर ५) गुरुकुंज आश्रम मोजरी स्वर गुरूकुंजाचे ६) महाराणा भ.म.मंडळ यवतमाळ ७) आचार्य विनोबा भावे भ.म.मंडळ सवांगी ८) श्री गुरुदेव अखिल भारतीय भ.म.मंडळ अंतर्गांव सावली ९) राजाश्री शाहू महाराज भ.म.मंडळ जूनी दहेली
महिला विभागत
प्रथम क्र.
१) संतकृपा महिला भ.म.मंडळ इंदिरानगर चंद्रपुर २) सर्वज्ञ महिला भ.म.मंडळ चमोर्शी ३) क्रांतिजोती महिला भ.म.मंडळ जैतापुर ४) श्री गुरुदेव जिजाऊ महिला भ.म.मंडळ नेहरूनगर चंद्रपुर ५) अप्पास्वामी सहापरिवार भ.म.मंडळ शेगांव वर्धा ६) नवदुर्गा महिला भ.म.मंडळ देवाळी चंद्रपुर ७ ) जय भवानी महिला भ.म.मंडळ नेहरूनगर चंद्रपुर
बाल विभागत
१) श्री गुरुदेव मानवसेवा छात्रालय गुरुकुंज आश्रम बाल भ.म.मंडळ मोजरी २) जय गुरुदेव सेवा बाल भ.म.मंडळ भेंडाळा ३) बाल गुरुदेव सेवा भ.म.मंडळ वरोरा ४) सर्वधर्म समभाव बाल भ.म.मंडळ मातरदेव ५) श्री गुरुदेव बाल भ.म.मंडळ रामपुर
तालुका स्थरीय विभागात
१) स्वराज्य ग्रामीण गु.से भ.म.मंडळ पिंपळगाव २) जगन्नाथ बाबा भ.म.मंडळरम्पुर् ३) श्री गुरुदेव सेवा भ.म.मंडळ सोनूर्ली ४) आदर्श गुरुदेव सेवा भ.म.मंडळ कुकुड़सात ५) सरस्वती महिला भ.म.मंडळ राजूरा ६) जय गुरुदेव सेवा भ.म.मंडळ कुकुसात
इत्यादिनी परितोषिक पटकाविले
त्यानंतर २० तारखेला रात्रो ९ वाजता विनोदी कीर्तनकार जयश्रिताई गावतुरे यांचे जाहिर कीर्तन पार पडले त्यात आदर्श श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ विरूर स्टेशन चे अध्यक्ष, मा.श्री ,ज्ञानेश्वरजी मोरे उपाध्यक्ष, देवीदासजी खोबरे सचिव, विनोदजी ठमके सहासचिव, प्रवीणजी चिड़े / मंगेशजी पावड़े कोषाध्यक्ष, उमेशजी मोरे सहकोषाध्यक्ष, प्रीतमजी राउत /राकेशजी कडुकर स्टेज म्यानेजर,वामानजी ठमके / भूषणजी कडुकर संघटक, संगेशजी पावाड़े सहसंघटक, विलासजी आक्केवार /नामदेवजी चिड़े सदस्य दिनेशजी अत्राम यांनी ग्रामवासियांचे तसेच आश्रयदात्यांचे मनपूर्वक आभार मानले शर्ते शेवटी राष्ट्रवंदना घेऊन समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ठमके तर आभार राकेश कडूकर यांनी केले.