बळीराम काळे,जिवती
जिवती (ता.प्र.): तालुक्यातील माराई पाटण येथील सामजिक कार्यकर्ते बळीराम काळे यांची मोठी मावशी श्रीमती सुदमतबाई माधव ढवळे (७०) यांचे दिनांक २७ जानेवारी २०२५ ला सकाळी ०७:१५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहते घरी माराई पाटण येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
श्रीमती सुदमतबाई माधव ढवळे (७०) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या परिवारावर ,नातेवाईक व मित्रमंडळीत शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २७ जानेवारी २०२५ रोज सोमवारला दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास जड अंतःकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शकडो नागरिकांनी अखेरचा निरोप देऊन,समशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य एक मुलगी असा आप्त परिवार आहे.