राजुरा तालुका प्रतिनिधी (राकेश कडूकर)
विरुर: राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन गावचे निवासी, साळवे कृषिकेंद्राचे मालक, प्रवीण बंडूजी साळवे यांचे वडील बंडूजी माधवराव साळवे यांचे अल्पशा आजाराने दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने दि. २७ जानेवारी २०२५ रोजी गंगापूजन व श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लटरूजी मत्ते (उपसेवाधिकारी गुरुदेव सेवा भजन मंडळ राजूरा ) उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री केशवजी बोढे ( कवठाळा ), श्री दिनकरजी ठेंगणे ( भद्रावती )श्री शुभाषजी साळवे ( आर आय राजूरा ) आदर्श श्री गुरुदेव सेवा भजन मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेशरजी मोरे, उपाध्यक्ष देवीदासजी खोबरे, सचिव विनोदजी ठमके, मंगेशजी पावडे, प्रवीणजी चिडे, उमेशजी मोरे, नामदेवजी चिड़े, दिनेशजी अत्राम, वामनजी ठमके, प्रीतमजी राउत, भूषनजी कडुकर राकेश कडुकर व समस्त साळवे परिवार उपस्थित होते.
त्यात समयोचित विचार व्यक्त केले. साळवे परिवाराच्या वतिने लटारुजी मत्ते यांचे हस्ते उपस्थित नातेवाईक,आप्तेष्ट मित्रपरिवारांना “ग्रामगीता” वितरीत करण्यात आली, उपस्थितांनी मौन पाळून बंडुजी साळवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यात संचालन श्री विनोदजी ठमके व आभार ज्ञानेश्वरजी मोरे यांनी केले.