अहेरी :- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी राजनगरीत तसेच आलापल्ली येथे आज महाराष्ट्राचे लाडके उप-मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवसाच्या निमित्य औचित्य साधून वाहतूक कामगार उपाशीपोटी वाहतूक करतात त्यांची अडचण जाणून अहेरी विधानसभा क्षेत्राचे पदाधिकाऱ्यांनी वाहतूक शिवसेना भारतीय कामगार संघटनाचे सदस्य तथा इतर शिवसैकांना टिफिन बॉक्स डब्बे वाटप करून वाढदिवस साजरा केले.
या शुभप्रसंगी अहेरी शिवसेना तालुकाप्रमुख अक्षय करपे,अरुणजी धुर्वे सर जेष्ठ शिवसैनिक तथा माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, प्रकाशभाऊ गद्दलवार, शिवसेना भारतीय कामगार संघटना विभाग अध्यक्ष अहेरी विधानसभा,अंकुश मंडलवार, शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हा प्रमुख, अहेरी विधानसभा व तालुका अध्यक्ष भारतीय कामगार संघटना अहेरी तथा अनेक शिवसैनिक उपस्थित होते.