पत्रकारांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्या :संभाजी ब्रिगेड

409
एकनाथ अवचार

नांदुरा:औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठी चे संपादक,प्रकाशक, वार्ताहार,यांचेवर स्थानिक प्रशासनाने कोरोणा बाबदची सत्य परिस्थिती दैनिकात मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले आहे.पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधास्तंभ आहे. स्वभोवतालची परिस्थिती जनतेसमोर ठेवणे हे पत्रकारांचे आद्यकर्तव्य आहे. परंतु कोरोणाबाबदची सत्य परिस्थिती मांडल्यामुळे स्थानिक प्रशासनाचा कोरोणाबाबत चां निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. यामुळे सुळबुद्धीने दैनिक दिव्य मराठीच्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. औरगाबादमधील या प्रकारामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झाले आहे. यामुळे आज दिनांक २८-०६-२०२० रोजी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून याचा तीव्र निषेध करत.  स्थानिक पत्रकारांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याची विनंती निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील,शहर उपाध्यक्ष शिवश्री कुलदीपदादा डंबेलकर, तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व नांदुरा तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.