गावोगावी भजन कीर्तनाला किमान ५० भाविकांना परवानगी द्या

446

 

विश्व वारकरी सेना जिल्हाध्यक्ष गजानन महाराज दहिकर

संग्रामपुर [ प्रतिनिधी] शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे लॉकडाऊन काळात सर्व धार्मिक कार्यक्रमाला बंदी होती शासन निर्णयानुसार त्याची अमलबजावणी विश्ववारकरी सेना च्या वतीने करण्यात आले लग्न कार्यक्रम जिवनाश्यक वस्तु विक्री दुकान; माल , दारु दुकानाला परवानगी देऊन पुर्वरत सुरु असुन मात्र भजन किर्तनाला परवानगी नसल्याने भाविकांची कुचंबना होत आहे शासनाने भजन किर्तनाला ५० भाविकांना परवानगी द्यावी अशी मांगणी विश्व वारकरी संप्रदाय सेना जिल्हाध्यक्ष ह भ प गजानन महाराज दहिकर यांनी एका निवेदना व्दारे तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे निवेदनात नमुद आहे कि वारकरी संप्रदायचे एक पाईक म्हणून शासनाला विनंती केली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन चालू झालेले आहे आणि तेव्हापासून वारकरी संप्रदायचे महाराष्ट्र राज्यात भजन कीर्तन सर्व बंद झालेले आहे . सरकारला या भयानक परिस्थितीला सहकार्य करण्याकरिता सरकारने जि बंदी घातली आम्ही त्यालासुद्धा सहकार्य केले आणि पायदळ वारीची वर्षानुवर्षेची परंपरा होती ती कितीतरी पालख्यांची परंपरा खंडित झालेली आहे आमच्या मनात त्याचेही दुख आहे पण शासनाने लग्नाला किमान ५० लोकांना परवानगी दिलेली आहे . देशी दारूचे दुकाने उघडलेले आहेत तिथेही भरपूर गर्दी आहे , आणि मॉलमध्ये भरपूर गर्दी दिसत आहे पण अजूनही वारकरी संप्रदायचे भजन कीर्तन करण्याकरिता आपण परवानगी न दिल्यामुळे भाविकांना भजन कीर्तन करता येत नाहीत शासनाने भजन कीर्तन करण्याकरिता किमान ५० भाविकांना परवानगी देण्यात यावी हि आणि जो जिल्हा रेड झोन मध्ये आहे त्या जिल्हयामध्ये आपण परवानगी द्यावी असा आमचा आग्रह नाही पण रेड झोनमधील यामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नसेल तर त्या गावामध्ये आपण परवानगी देण्यात हरकत नाही म्हणून शासनाने गांभीर्याने विचार करून आणि वारकरी संप्रदायच्या भाविकांच्या भावनेचा आदर करून दि ५ / ७ / २०२० पर्यत भजन कीर्तनाला अटी व नियम लागु करून परवानगी दवावी अन्यथा विश्ववारकरी सेना पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय; तहसिल कार्यालय समोर सोशल डिस्टंन्सींग ठेऊन टाळ मुदुंगाच्या गजरात नाराजी व्यक्त करण्याचा इशारा निवेदनातुन दिला निवेदनावर जिल्हाध्यक्ष गजानन दहिकर महाराज; तालुकाध्यक्ष योगेश महाराज तांबडे; दिनेश महाराज भामद्रे यांच्या सह्या आहेत