पोळ्याचा दिवशीच वाघाच्या हल्यात शेतकरी ठार ;राजूरा तालुक्यातील घटना

405

 

राजूरा

जंगल शिवारात पाळीव जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना राजूरा तालुक्यात घडली आहे.ऐण पोळा सणाचा दिवशीच घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वासूदेव कोंडेकर असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.ते नवेगाव येथिल रहिवासी होते.

राजूरा तालुक्यातील नवेगाव येथिल वासूदेव कोंडेवार ( वय 50 ) हे आपल्या मालकीचा बैलांना चराईसाठी शेतात घेऊन गेले होते.कोंडेवार यांचे शेत जंगलालगत आहे. 4 वाजताचा सूमारास बैल घेऊन परत येत असतांना वाघाने हल्ला केला. या हल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र विरूर अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्र.145 मध्ये घडली. घटनेची माहीती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. ऐण पोळ्याचा दिवशी शेतकरी दगावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.