तीन ते चार महिने लोटूनही थ्रीजी सेवा सुरू झालीच नाही

426

 

 

गडचीरोली / जिल्हा प्रतिनिधी प्रशांत शाहा

चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे २०१६ मध्ये भारत संचार निगम लिमिटेड(BSNL 2G)चे टॉवर सुरू करण्यात आले
तेही सेवा नेहमीच लपंडाव होत असते
रेगडी परिसरातील नागरिकांनी वारंवार थ्री जी सेवा ची मांगणी केले
त्या मांगणीला प्रतिसाद देत कंपनीने मागील तीन ते चार महिन्या पूर्वी रेगडी येथे थ्रीजी सेवा देण्या करीता मशीनेही सुध्दा लावले परंतु आत्ता त्या कडे कोणतेच अधिकारी लक्ष देत नसून काम जैसेथे आहे
परिसरातील नागरिक या भोंगळ कारभारामुळे रोष वैक्त करीत आहेत
विशेष म्हणजे रेगडी येथे जिओ 4G ची सेवा पण आहे परंतु गोर गरिबांना रीचार्जेचे भुर्दंड अधिक बसत असल्याने गोर गरीब नागरिक बीएसएनएल च्या थ्रीजी सेवा मिळण्याची वाट बघत आहेत
तरी या कडे कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित थ्रीजी सेवा सुरू करावी अशी मांगणी रेगडी,विकासपल्ली,माडेआमगाव परिसरातील नागरिकांन कडून केली जात आहे.