राजुरा शहर व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे स्व. राजीव गांधी जयंती चे आयोजन.
राजुरा (ता.प्र) :– माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक व आधुनिक भारताचे शिल्पकार स्व. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. राजीव गांधी यांनी ‘आधुनिक तंत्रज्ञानमय भारत’ बनविण्याचे स्वप्न पाहीले होते, त्यांच्या प्रयत्नातूनच आज आपल्याला प्रगतशील देश दिसत आहे. ते आधुनिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञानमय, पुरोगामी आणि सुधारणावादी विचाराने देशाचा विकास करण्यासाठी आग्रही होते. पंचायतराज व्यवस्थेचा स्विकार करुन त्यांनी ग्रामीण भारताला सशक्त केले. त्यांचे विचार आजच्या युवक वर्गासाठी आणि संपूर्ण माणवमात्रांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. ते स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या प्रसंगी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अशोकराव देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, अल्पसंख्याक अध्यक्ष सकावत अली, जि. प. सदस्या मेघा नलगे, नंदकिशोर वाढई, माजी सभापती कुंदा जेनेकर, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, युवक शहराध्यक्ष आशोक राव, पंचायत समिती सदस्य तुकाराम माणुसमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रंजन लांडे, विकास देवाडकर, धनराज चिंचोलीकर, कवडु सातपुते, नगरसेवक मजीद कुरेशी, रवी करवटकर, आर्वी सरपंच शालु लांडे, अॅड चांदेकर, नगरसेवक हरजीत सिंग, वामन वाटेकर, उपसरपंच अब्दुल जावेद, कुचनकर यासह कांग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाझ अहमद यांनी तर आभार प्रदर्शन युवक काँग्रेसचे महासचिव आकाश मावलीकर यांनी केले.