सूपारी देऊन केली पत्नीच्या प्रियकराने पतीला ठार

414

नागभीड

नागभिड तहसील अंतर्गत येणाऱ्या मागंली येथील गुरुदेव तुळशीराम चौधरी वय 36 वर्ष हा 17 ऑगस्ट रोजी नागभिड येथे रेल्वेत नौकरी करून सायंकाळी 7 चे सुमारास गावाला जात असताना बामणी गावाजवळ दोघांनी चालू गाडीवर वार करून खून केला. त्यानंतर अक्षय वसंता पांडव वय 22 राहणार नवेगाव हंडेस्वरी व प्रियकर गिरिधर गेडाम वय 40 हे दोघेही फरार झाले. नागभिड येथील पोलिस स्टेशन येथे 22/2020 गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी कलम 188 नुसार पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्हा कबुल केला असून प्रियकराने पतीला ठार मारण्याची सुपारी दिली होती असे प्रियकराने सांगितले असून  न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.  तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव कोरवाते करीत आहे. दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास बाकी असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.