बेरोजगार, शिक्षण आणि युवकांच्या अनेक समस्यांना चर्चा.
राजुरा (ता.प्र) :– महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. कुणाल दादा राऊत यांचे राजुरा विधानसभा युवक काँग्रसतर्फे शंतनु धोटे यांच्या नेतृत्वाखाली जंगी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या समोर बेरोजगारी, शिक्षण आणि युवकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने कोणतेही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे संपूर्ण देशात आज युवक अतिशय नैराश्याने ग्रस्त आहेत. अनेक विभागात मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त आहेत मात्र केंद्र सरकार ती न भरता सुशिक्षित तरुणांना बेरोजगारी, नैराश्याच्या खाईत लोटत आहे. शिक्षण क्षेत्रात देखील अनेक अडचणी आजच्या युवकांना भेडसावत आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणून युवकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका मांडण्यात आली.
तसेच शंतनु धोटे यांनी राजुरा विधान सभा क्षेत्रातील युवकांना नव नव्या रोजगार
संधी युवक काँग्रेस मार्फत कश्या उपलब्ध करता येईल हे सांगितले. युवक काँग्रेस महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढीव करिता उत्तम कार्य करत आहे, तरीही विदर्भाच नेतृत्व कुणाल राऊत यांनी आज पर्यंत उत्तम पणे केल आहे समोर महाराष्ट्रच नेतृत्व सुद्धा कुणाल राऊत यांनी करायला हव व विदर्भाच नाव उज्ज्वल करायला हव ही इच्छा शंतनु धोटे यांनी मांडली.
राजुरा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, युवा उपसरपंच इर्शाद शेख यांनी सुद्धा आपले पक्ष वाढीव करिता आपले मत मांडले. या वेळी इंजिनिअर असलेले नवे तरुण जगदीश मधुकर हांडे अध्यक्ष वीरशैव कांनकैया चर्माकर समाज चंद्रपूर व विपीन देऊळकर यांनी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला व येणाऱ्या काळात जिल्ह्यात युवक काँग्रेस वाढीव साठी प्रयत्न करणार याची ग्वाही दिली.
या प्रसंगी चंद्रपूर युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष हरीश कोटावर , प्रदेश सचिव रूचीत दवे- सचिन कात्याल – कादर शेख ,
NSUI अध्यक्ष यश दत्तात्रय व कुणाल चाहारे, तृषार पडवेकर.
चंद्रपूर युवक काँग्रेस तर्फे राजेश अड्डुर , सूरज कंनुर, शंतनु सातपुते, अंकेश मडावी.
राजुरा युवक काँग्रेस तर्फे अशोक राव, प्रणय लांडे, शाहनवाज कुरेशी, शैलेश लोखंडे, सीताराम मडावी, प्रीतम सातपुते, रुपेश चुधरी, विलास मडावी, टेकमजी, आदी उपसथित होते.