काय म्हणता ? गावात अद्यापही पक्का रस्ता नाही…! गाव अनेक समस्यांनी ग्रासलेलं..! कुठे आहे हे गाव ..

333

सूनिल शेळके / जिवती

जिवती तालुक्यातील अनेक गावगुडयात जायला रस्तेच नाही.येलापूर ग्राम पंचायत अंतर्गत तीनशे मीटर अंतरावरील कोल्लाम गुडयात स्वातंत्राच्या सतरीनंतरही जायला रास्त नाही.एवढेच काय तर वस्तीत सुद्धा एकही सिमेंट कांक्रेटचा साधा रस्ता देखील एवढ्या वर्षात गामपंचातीने बांधला नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

जिवतीवरून 12 किमी अंतर तेलंगणा सीमेवर येलापूर गामपंचात असून या ग्रामपंचायत अंतर्गत येलापूर,लहान येलापूर, गोंडगूडा आणि कोल्लामगुडयाचा समावेश आहे. बाकी सर्व गावात जाण्यासाठी रस्ते आहेत,वस्तीतही कांक्रेटचे रस्ते बनले असून फक्त कोल्लामगुडयाला गेल्या साठ ते सत्तर वर्षात रस्ता का नाही हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मुख्य रस्ता तर सोडाच पण गावात सुद्धा सीमेंट कांक्रेटचा साधा रस्ता सुद्धा नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वी याच वस्तीतील नळयोजना बंद असून येथील महिला तीनशे मीटर अंतरावरून चिखलाने माखलेल्या रस्त्याने विहिरीचे पाणी भरत आहेत.गुडघाभर पाणी साचलेल्या रस्त्याने महिलावर्ग डोक्यावर पाणी आणत असल्याने ‘खाली गुडघाभर तर डोक्यावर गुंडभर ‘पाण्याचे ओझे असेच म्हणावे लागेल.गावात जाण्यासाठी पायवाट असून रस्त्याच्या दोन्ही कडेला अनेक ठिकाणी कंबरभर गवत वाढलेले आहे एवढेच काय तर विहिरीच्या सभोवताल आणि गावातही गवतच असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंबंधात पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता येत्या एक ते दोन दिवसात नळयोजना सुरू करू आणि रस्त्याच्या कडेला वापलेले गवत कापने सुरू आहे असे सांगितले.तसेच रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.

— सण 2016-17 मध्ये या वस्तीसाठी रस्ता मंजूर होण्याकरिता आम्ही ठक्कर बाबा योजनेअंतर्गत ठराव पाठविला होता पण आजपर्यंत वरील पातळीवरून मंजुरी मिळाली नाही.आता सुद्धा ठराव मंजूर करून परत पाठविणार आहोत आणि येत्या काही दिवसात या वस्तीला रस्ता मंजूर करन्यायासाठी पूर्णतः प्रयत्न करणार आहोत.
– माधव पेंदोर सरपंच,
येलापूर

– सदर ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असून नऊ महिन्याअगोदर पेसाच्या निधी मंजुरीसाठी ठराव पाठविला आहे.त्या निधीअंतर्गत जे काही कामे असतील ते कामे नक्कीच करु.
– एस. डी. वऱ्हाडे ग्रामसेवक
येलापूर