धनगर समाजाच्या नेत्याला राज्यावर योग्य मान न दिल्यामुळे औरंगाबाद मधून जाहीर निषेध . रंगनाथ राठोड

299

औरंगाबाद प्रतिनिधी/ गणेश तडसे

 

जिल्हा अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती औरंगाबाद. धनगर समाज संघर्ष समिती चे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब शिंदे यांचे कार्य देशात संघटन करत आहे व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नेत्याला चांगले माहित आहे असं असतानाही भाजपाच्या नवीन कार्यकारणी मध्ये त्यांचे नाव प्रदेश कार्यकारणी मध्ये घ्यायला हवे होते मात्र  धनगर समाजाचा नेतृत्व भाजपला मान्य नाही .म्हणून त्यांना संपवण्यासाठी भाजपने त्यांना नाशिक शहर भटके-विमुक्त अध्यक्षपदी निवड केली हा धनगर समाजाचा अपमान आहे . महाराष्ट्राच्या नेत्याला तुम्ही शहरावर थांबवत आहे . त्याच्या त्यागाचीच भाजपमध्ये किती किंमत आहे हे यावरून स्पष्ट होते तरीही धनगर समाज वेड्यासारखा या लोकांमागे पळत असेल तर मी रंगनाथ राठोड या गोष्टीचा निषेध जाहीर निषेध करतो बापूसाहेबांना राज्य कार्यकारिणी वर घ्यायला पाहिजे होते. याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्र भर दिसेल.जय मल्हार जय.. अहिल्या देवी.. जय जिजाऊ… जय शिवराय..।