मरकागोंदी येथील नळयोजने चा बट्याबोळ, लाखोंचा निधी गेला पाण्यात

412

दुषित पाण्याने नागरीका च्या आरोग्याला धोका?

दिपक साबने/जिवती

जिवती तालुक्यातील डोंगरपायथ्याशी पकड़ीगुड्डम पंचक्रोशीतील “धनकदेवी” ग्राम पंचायत अतर्गत येत असलेल्या १००% आदीवासी लोक वस्ती असलेल्या गावातील लाखो रूपये खर्च झालेल्या नळ योजना सुरू होण्या पुर्वी च तुष्णा न भागविता बंद अवस्थेत धुळखात पडल्याने पाणी पुरवठा योजनेचा निधी पाण्यात गेल्याचा आरोप आहे. गावात कुपनलिका बोअरवेल आहे मात्र पाणी शुद्धीकरण ब्लीचीगं नियमित केल्या जात नाही. बोअरवेल जवळ सांडपाणी साचुन पाणी दुषित होत आहे. ग्राम पंचायत कडे पेसा १४ वित्त आयोगाचा, पेसा निधी चा लाखोचा निधी मिळतो पंरतु गावात एक ही काम मागील ४ वर्षात झाले नसल्याची नागरिकांमध्ये बोंब सुरू आहे. नाली बांधकाम सांडपाणी वाहते करने आवश्यक असताना ग्राम पंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्याच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप दिलीप मडावी, शंकर मडावी, संदीप सिडाम, चंद्रभान कोटनाके, लक्ष्मण घोडाम यांनी केला आहे. तातडीने शौच खड्डा तयार करुण सांडपाण्याची व्यवस्था व परीसर सफाई करा अन्यथा ग्राम पंचायत पुढे आंदोलन करण्याचा इशारा दिलीप मडावी, शंकर मडावी, संदीप सिडाम, चंद्रभान कोटनाके, लक्ष्मण घोडाम यांनी दिला आहे.