बिबट्याला त्वरित जेरबंद करावे : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना

354

चंद्रपूर

उर्जानगर परिसरातील पर्यावरण चौकात लावण्या उमाशंकर धांडे या 5 वर्षीय मुलीला बिबट्याने उचलून नेल्याच्या घटनेने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली असून त्या अनुषंगाने वनाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना सुद्धा दिल्या आहेत.

या घटनेची माहिती कळताच आ. मुनगंटीवार यांनी वनाधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री सपाटे यांच्याशी संपर्क साधून सदर परिसरातील झाडे झुडपे त्वरित कापण्यात यावी अशा सूचना सुध्दा आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने त्वरित कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.