HomeBreaking Newsदुचाकी अपघात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू

दुचाकी अपघात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू

 

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली जवळील घटना

गोंडपिपरी-: आकाश चौधरी

गोंडपीपरी ते खेडी मार्गावर रस्ता रूंदीकरनाचे काम सूरु आहे. मागील दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.तेव्हापासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी दि(२६) सायंकाळी ८ च्या सुमारास घडली.पवन नारायण चापले करंजी वय (३८) असे मृतक तर शिकृष्ण गेडाम वय (४०) बलरशाहा बामणी असे जखमीचे नाव आहे.
पवन व श्रीकृष्ण दोघेही परिवहन विभागात वाहनचालक असून कार्यालयीन कामाकरिता गडचिरोली आगार व्यवस्थापक यांच्याकडे गेले होते.वाहनचालक असून सुद्धा यांना e-paas शिवाय जिल्हा ओलांडायची परवानगी नाही आष्टी पोलिसांनी e-paas शिवाय जाण्याकरिता परवानगी न दिल्याने आड मार्गाने शासकीय कामानिमित्य गडचिरोली गाठून काम पूर्ण करून येताना त्यांचा मूल खेडी मार्ग एका बाजूने खोदून असल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला.कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहनचालक असलेल्या पवन ला मात्र जीव गमवावा लागला.अपघातानंतर लगेच उपस्तितांनी रुग्णवाहिकेला फोन केला मात्र गोंडपीपरी रुग्णालयाला १०८ एकच रुग्णवाहिका असल्याने ती पोहचू शकली नाही अपघातानंतर तबल एक तास उशिरा वढोलीतील सामाजिक कार्यकर्ते सुरज माडुरवार,सुरेंद्र मडपल्लीवार,गिरीधर चुदरी,दिनेश भोयर यांनी गोंडपीपरी पोलिसांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु डॉकटरांनी पवन ला मृत घोषित केले.व जखमी गेडाम याला चंद्रपूर उपचाराकरिता रेफर करण्यात आले.गोंडपीपरी खेडी मार्गाच्या कंत्राटदारवार मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!