जिल्हास्तरीय पूरस्थिती, कोरोना व विकासात्मक कामाबाबत आढावा बैठक संपन्न.
गडचिरोली
( जाहीरात )
जिल्हयातील पुढील 3 वर्षात विकासात्मक परिवर्तन घडवून आणत असताना सर्व कामे गुणवत्तापूर्वक करणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी जिल्हा यंत्रणेवर आहे. त्यासाठी सर्वच स्तरावरील प्रशासनाणे आपले योगदान द्यावे आशा सूचना पालकमंत्री तथा मंत्री नगरविकास श्री. एकनाथ शिंदे यांनी आज आढावा बैठकिमध्ये जिल्हा प्रशासनाला दिला. प्रशासनाने कोविडपासून जिह्याला चांगले सांभाडले आहे आता पूरस्थिती मध्येही आवश्यक मदत वेळेत नागरिकांपर्यंत पोहचवावी असे निर्देशही त्यांनी यावेडी उपस्थिताना दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, उपवनसंरक्षक कुमारस्वामी तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील 12 प्रमुख मार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील जवळपास 2100 लोकांना सुरक्षित रेस्क्यू केलेले आहेत.
आज पालमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉटर ने पुरस्तीतीचा निरीक्षण केला.