गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा
उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र पोटेगांव हद्दीतील नागवेली येेथील सखाराम झगडू नरोटे ३३ वर्ष यास ०१ सप्टेंबर २०२० च्या रात्री दरम्यान २० ते २५ बंदुकधारी नक्षलवादी त्याच्या घरी जावून त्याला व त्याचा भाउ शामराम अलसू नरोटे यांना घरून घेवून जावून मारहाण केली. त्यानंतर शामराव नरोटे यास गावात सोडून दिले व मृतक सखाराम नरोटे यास जवळच असलेल्या हलामीटोला परिसरात घेवून जावून येडमपायली ते हलामीटोला रोड बांधकाम ठेकेदार यांच्या कडून पैसे वसुल करून नक्षलवादी पार्टीला दिले नाही. या कारणावरून नक्षलवाद्यांनी त्याला बंदूकीची गोळी झाडून ठार केले. सखाराम झगडू नरोटे हा २०१५ पासून नक्षल समर्थक म्हणून कार्यरत असल्याचे पोलीस दप्तरी नोंद असून तो नक्षलवाद्यांना मदत करीत होता.
गडचिरोली जिल्हा गेल्या ४० वर्षापासून नक्षलग्रस्त असून नक्षलवाद्यांचा पाया असलेल्या एआरडी, जीआरडी, जनमिलीशिया सुध्दा नक्षलवाद्यांच्या दहशतीला बळी पडत आहेत. नक्षलवाद्यांनी आजपावेतो ५३५ पैकी काही सामान्य नागरिकांचा पोलीसांचे बातमीदार असल्याचे संशय घेवून तसेच नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या नक्षल समर्थकांचा त्यांचे वैयक्तीक वाद व पैश्याच्या वादावरून खुन केला आहे.