प्रतीक्षा संपेल तरी केव्हा?
गोंडपिपरी / शेखर बोनगीरवार
ग्रामपंचायत गोजोली(मक्ता) येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गोजोली “तंटामुक्त गाव” म्हणून शासनाकडून सन 2010 या वर्षीचा पुरस्कार प्राप्त झाला.
पुरस्काराचा निधी 200000(दोन लक्ष) रुपये ग्रामपंचायत ला प्राप्त झाले.
प्राप्त झालेल्या पुरस्काराच्या रकमेला खर्च करण्यासाठी शासनाने निकष ठेवले होते त्या आधारावर ग्रामसभेमध्ये एकूण रकमेच्या पाच टक्के निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करून उर्वरित रक्कम सार्वजनिक वाचनालयावर खर्च करावे असा ठराव ग्रामस्थांनी ,ग्रामसभेत पारित केला.
वाचनालयाचे नाव ठरविताना जनमत घेऊन “क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय”असे नाव देण्यात आले व वाचनालयाच्या बांधकामासाठी जागा नियोजित करण्यात येऊन बांधकामाला सुरुवात केली खरी,पण दहा वर्ष लोटूनही काम पूर्ण झालेच नाही.
अतिशय परिश्रम घेऊन पुरस्कार प्राप्त करण्यात आला यामध्ये समस्त ग्रामस्थांचे व तंटामुक्त गाव समिती गोजोलीचे मोठे योगदान आहे, असे असूनही मिळालेल्या निधीचा योग्य वेळी,योग्य वापर न झाल्याने सदर बांधकाम अपुरे असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसत आहे.
आमच्या हक्काचं सार्वत्रिक वाचनालय आम्हाला बांधून मिळेल काय ? अशी आर्त हाक ग्रामस्थांची असून,थेट निवडणुकीमध्ये अविरोध निवडून आलेले नवीन सरपंच श्री गिरीधरजी कोटनाके यांच्याकडून युवक वर्गाच्या तसेच सर्व ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता तरी आमची प्रतीक्षा संपेल काय आहे? अशी गावकर्यांची आर्त हाक आहे.
समस्त ग्रामस्थ वाचनालयाच्या प्रतीक्षेत आहेत पण ग्रामपंचायत गोजोली (मक्ता) चे पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.