गोंडपिपरी तालुक्यातील पूरग्रस्तांना भरीव व तातडीने मदत देणार – आ. सुभाष धोटे

472

गोंडपिपरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची आ. सुभाष धोटेव्दारे पाहणी

गोंडपिपरी -आकाश चौधरी

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातिल १८ गावातील शेतकऱ्यांचे शेकडो  हेक्टर धान, कपाशीच्या शेती सह काही गावे पाण्याखाली आल्याने  शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुसकानग्रस्त शेतकऱ्यांचे व नागरिकांना  मदत मिळावे यासाठी प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. हि प्रक्रीया पुर्ण होताच तातडीने मदत देण्यात येणार. त्यासाठी आपण जातीने लक्ष्य पुरविणार आहे. असे आश्वासन आमदार सुभाष धोटे यानी आज गोंडपिपरी येथिल सा. बा. विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

आज आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील पुरग्रस्त गावाना भेट दिली. तालुक्यातिल
परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विस्थापित झालेल्या  नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

आपदग्रस्तांना भांडे व कपडेसाठी पाच हजार रुपये व अन्नधान्यासाठी पाच हजार रुपये याप्रमाणे प्रति कुटुंब 10 हजार रुपये प्रारंभिक तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे आमदार धोटे यांनी सांगितले. पहिले पाच व नंतर पाच असे एकूण 10 हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे.

 पूरग्रस्तांना ही प्राथमिक मदत असली तरी सर्व्हेअंती भरीव मदत देण्यात येणार आहे. यात 100 टक्के घरे पडलेल्यांना 95 हजार रुपये, घराच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, शेतीच्या नुकसानकरिता प्रति हेक्टर 18 हजार रुपये, जनावरे मरण पावल्यास त्याची वेगळी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आमदार धोटे यांनी  स्पष्ट केले आहे.

शिवणी, पानोरा, सालेझरी, राळापेठ व तारसा(खुर्द) या  पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची, पडलेल्या घरांची पाहणी केली व आपदग्रस्त नागरिकांसोबत, शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला.

पूरग्रस्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून तातडीने प्रत्यक्ष सर्व्हेक्षण व पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. सर्व गावा – गावात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.पुरामुळे गावागावात गाळ साचला असल्यास गाळ तातडीने काढून ब्लिचिंग पावडर टाकण्याचे व आपादग्रस्त गावात तातडीने आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश आमदार धोटे यांनी आरोग्य विभागाला दिलेत.

सर्वेक्षण करीत असतांना कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन प्रत्यक्ष तपासणी व पंचनामे करून अहवाल तयार करावा. अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात.

यावेळी उपविभागीय अधिकारी,  कृ. उ.बा.समितीचे सभापती सुरेश चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कृषी अधिकारी मंगेश पवार, काँग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष राजिवसिंह चंदेल, प्रा. शंभुजी येलेकार, न.पं.चे नगरसेवक प्रविण नरशेट्टीवार, प्रदिप झाडे, बबलु कुळमेथे, विनोद नागापुरे, अरविंद जेऊरकर, राजु राऊत, आनंद मुलकलवार आदी मान्यवर उपस्थित होते.