जाहीरात
चंद्रपुर- मुन्ना तावाडे
घरात अठराविश्व दारीद्र…पतिच्या जान्याने ती विधवा. मग मुलगाही डेंगुने मरण पावला. सोबतच काही दिवसांनी दोन मुलीही विधवा झाल्या. संपूर्ण संसाराचा ओझा तिच्यावर आला. हातावर आणून पानावर खाण्याची परीस्थिती तिच्यावर आली. शेतीची वेळ जवळ आली. घरात पैसे नाही,
या विवंचनेत सापडली. मग काय तर मुलींच्या नावाने असलेली कोरडवाहू शेतीचे कागद घेउन पिक कर्जासाठी बँकांच्या पायर्या झिजवू लागली. दोन वर्षे लोटली मात्र कर्ज मिळेना. म्हनतात ना जो पुढारी त्याचा काम लई भारी अशी वेळ ‘त्या’ विधवेवर आली.आणि हा प्रसंग प्रहारच्या एका कार्यकर्त्यांकडून जिल्हाअध्यक्ष सुरज ठाकरे यांना मिळाली.त्यांनी लगेच त्या महिलेला घेउन बँकेत गेले. त्या अधिकार्याला प्रहार स्टाईलने ठनकाऊन पिक कर्ज मंजूर करुन दिले. त्यामुळे त्या महिलेला जे दोन वर्षात शक्य न झाले नाही ते आज शक्य झाल्याने तिने आनंदाचा श्वास घेतला आहे. आता परीवारात आनंदाचे वातावरण असून प्रहार संघटनेचे पाटागुडा वासियांकडून अभिनंदन होत आहे. जिवती तालूक्याची ओळख म्हणजे लय भारी. अतीदुर्गम व डोंगराळ भाग. अश्या मातीत मुद्रीकाबाई सुर्यंवंशी यांचे तुकाराम सुर्यवंशी पाटागुडा यांचेशी मागील ५० वर्षापूर्वी विवाह पार पडला. यांचा गुन्यागोविंदाने संसार चालू होता. मात्र या कुठूंबावर देवाने झळप घातली . आणि चोविस वर्षीय मुलगा डेंगुने मरन पावला. देवाची दूरद्रुष्ठी थांबाली नाही.तर काही दिवसातच दोन वैवाहिक मुलीही विधवा झाल्या. तर दोन अविवाहित मुली त्या म्हाताऱ्या आईला आश्रा देत आहे.दोन मुली, विधवा मुलींचे मुल हा सारा भार तिच्यावर पडला आहे. मुद्रीकाबाई ६५वर्षाची म्हातारी आहे.मागील दोन वर्षापूर्वी शेतीसाठी पैसा ऊपलब्ध नसल्याने त्यांनी पिक कर्जासाठी बँकेच्या पायर्या झिजऊ लागली. मात्र त्या म्हातारीला कर्ज देन्यास बँक व्यवस्थापक वेळ मारुन नेत होते. असे करता करता दोन वर्ष लोटले . ति हताश होऊन बीचारी निरुस्ताही झाली. ही बाब प्रहार संघटनेचा कार्यकर्ता जिवन तोगरे यांना समजली. त्यांनी लगेच हा सारा प्रकार प्रहारचे जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांना कळविली. त्यांनी लगेच क्षणाचाही विलंब न करता आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत पाटागुडा येथील मुद्रीकाबाई सुर्यंवंशी यांचे घर गाठले. व तीच्या संपूर्ण समस्या जानून घेतल्या. ६५वर्षीय मुद्रीकाबाईने तिच्या वाट्याला आलेले संपूर्ण प्रसंग कथन केले. ते प्रसंग खरच अंगावर शहारे आननारे होते. पहील्यांदा पती मरन पावला. तर काही दिवसातच डेंगुने मुलगाही मरन पावला. एवढ्यावरच तिच्यावरचे संकट थांबले नाही.तर दोन विवाहीत मुलीही विधवा झाल्या. आणि कुठूंबाचा ओझा तिच्यावर पडला.
त्यामुळे त्यांचे खान्या पीन्याचेही मोठे प्रश्न उद्धभवले. भिक मागल्याशिवाय त्यांच्याकडे प्रश्नच नव्हता. हे सारे प्रसंग ऐकून प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे काही वेळ सुन्नच राहीले. आणि त्या वृद्ध विधवा महिला मुद्रीकाबाईला घेऊन जिवती येथील बँक गाठली. बँकेच्या व्यवस्थापकाला प्रहार स्टाईलने धारेवर धरले. व पिक कर्ज मंजूर करुन घेत त्या विधवेला घरी सोडले. त्यामुळे ति वृद्ध महीला आनंदाचा स्वास घेत प्रहारचे अभिनंदन मानले.