कृषीपंप विज जोडणीची कामे तातडीने पुर्ण करा

1179

 

आमदार सुभाष धोटे यांची महाराष्ट्र राज्य, विद्युत वितरण कंपनी परिमंडळ, चंद्रपूर यांना निवेदनाव्दारे मागणी

राजुरा (ता.प्र) :–

राजुरा विधानसभा मतदार संघातील कृषीपंप विज जोडणीचे कामे गेली अनेक दिवसापासुन प्रलंबित आहेत. विद्युत पुरवठा मिळणेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करून व डिमांड भरून जवळपास 2 ते 3 वर्षाचा कालावधी लोटुन सुध्दा सदर शेतकऱ्यांना कृषीपंप विद्युत पुरवठा जोडुन न-मिळाल्याने जवळपास 300 ते 400 शेतकरी विद्युत पुरवठयापासुन वंचित आहेत. सिचंन सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिक उत्पादनावर याचा विपरीत परीणाम होत आहे. सततचा दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे.
काही वर्षापासुन आपले विभागाचे एका कृषी पंप विज ग्राहकाला एक ट्रान्स्फार्मर हे धोरण अवलंबले आहे. परंतु सद्या परीस्थितीत विभागाकडे निधीची कमतरता असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला कृषी पंप विज जोडणी करीता स्वतंत्र ट्रान्स्फार्मर देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विद्युत पुरवठा गेलेला आहे. अशा कृषी पंप विज ग्राहकांना विद्युत पुरवठा जोडुन दिल्यास विभागावरील ट्रान्स्फार्मर करीता लागणारा खर्च कमी होईल व कृषी पंप विज ग्राहकांना वेळीच विद्युत पुरवठा जोडुन देणे शक्य होईल त्याकरीता राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास असलेल्या विद्युत पुरवठयावरून कृषी पंपाचे विज जोडणीची कामे तातडीने पुर्ण करण्यात यावीत अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे.