उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्नियुक्ती द्यावी -आमदार सुभाष धोटे

506

 

राजुरा (ता.प्र) :– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियाना (उमेद) ग्रामीण भागातील महीलांच्या सक्षमिकरण आर्थिक, सामाजिक व राजकीय जीवन बदलाचे प्रतीक आहे. या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकुण ५ लाखांच्यावर महिला गटाची व ५० लक्ष कुटुंबांचा यात समावेश आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी समर्पित भावनेने काम करणारी यंत्रणा उभी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून जवळपास १७५०० गटाची व ९९३ ग्रामसंघाची निर्मिती झाली आहे. प्रभागसंघ बांधणीचे काम प्रगती प्रथावर आहे. त्यामुळे उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना सेवेत पुनर्नियुक्ती द्यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनव्दारे केली आहे.
उमेद अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता या अभियानातील मोठया प्रमाणावर कर्मचारी कमी केल्यास अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीवर गंभीर परिणाम होणार आहे. अभियांनातील कर्मचारी बेरोजगार होऊन त्यांचे कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांना त्यांच्या सेवेत पुनर्नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी उमेद कर्मचारी कल्याण मंडळ चंद्रपूर या संघटनेनी केली आहे. याची दखल घेत राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैन यांचेकडे उमेद अभियानातील कर्मचारी यांना शासनाचा धोरणात्मक निर्णय होई पर्यंत सेवेतुन कमी करण्यात येऊ नये व अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्नियुक्ती देण्यात यावी हि मागणी निवेदनव्दारे केली आहे.