कांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घ्या -अॕड. मेघा रामगुंठे

700

चंद्रपूर / वर्षाताई बावनवाडे

कोरोना महामारीमुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पहीलेच शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सुरु असतांनाच दुसरीकडे केंद्र शासनाच्या तुघलकी कारभारामुळे कांदा निर्यात बंदीचा कायदा करुन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व भविष्यातील उन्नती या कायद्यामूळे खुंटली जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे नुकतीच जाहीर केलेली कांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घेन्यात यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनातून रायुकाँच्या नागपूर विभागीय महीला अध्यक्ष अॕड.मेघा रामगुंठे यांनी केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांची तर बिकट परीस्थीती निर्माण झाली आहे. जगाचा पोशींदा म्हणून ओळखल्या जानार्या बळीराजाच्या कांद्यावरच निर्यातबंदी केल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. हा सारा प्रकार बघता शेतकऱ्यांना अतोनात नुकसानीला सामोरे जावे लागनार आहे. कृषि प्रधान देशातील शेतकऱ्यांना सरकारने कांदा निर्यात बंदी वालागू केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागनार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील परीस्थिती बघता आपल्या सरकारकडून काःदा निर्यातबंदी त्वरीत रद्द करन्यात यावे. अश्या मागणीचे निवेदन शिष्टमंडळ.. प्रज्ञा पाटील शहराध्यक्ष. अश्विनी तालापल्लीवार शहर उपाध्यक्ष . मंगला तेलंग शहर सभासद वर्षा बनसोडे शहर वर्षाताई बावनवाडे. रायुकाॕच्या विभागीय महीला महासचीव अॕड मेघा रामगुंठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठविल्या आहेत.