गडचिरोली जिल्ह्यात आज 54 कोरोनामुक्त, तर 28 नवीन बाधित

597

दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

जिल्ह्यात आज सक्रिय कोरोना बाधितांपैकी 54 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. तसेच नवीन 28 जण कोरोना बाधित आढळून आले. गडचिरोली व आरमोरी येथील एक एक जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 54 रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील 21 जणांचा समावेश आहे. चामोर्शी मधील 13, धानोरा 10, अहेरी 3, आरमोरी एक, कोरची एक, कुरखेडा एक, मुलचेरा एक आणि वडसा येथील तीन जणांचा समावेश आहे.

नवीन 28 बधितांमधे गडचिरोली 16, चामोर्शी 7, मुलचेरा 1 व अहेरी 4 अशा 28 जणांचा समावेश आहे.

गडचिरोलीतील 16 जणांमधे सेमाना रोडवरील एक जण, नवेगाव मधील दोघे, रामपुरी वार्डातील एक जण, हनुमान वार्डातील एक जण, रामनगर येथील एक जण, कॅम्प भागातील एक जण, कन्नमवार वार्डातील एक जण, आयटीआय चौकातील एक जण, शिवाजीनगर येथील दोघे, वार्ड नंबर 15, महुर नांदेड येथून आलेले एक जण यांचा समावेश आहे. चामोर्शी येथील 7 जणांमध्ये आष्टी येथील सहा जण, किष्टापूर येथील एक जण, मुलचेरा तालुक्यातील एक जण सुंदरनगर, अहेरी येथील चार जणांमध्ये देचालीपेठा येथील एक जण, आलापल्ली येथील दोघे आणि मरपल्ली येथील एक जणांचा समावेश आहे. अशा प्रकारे आज नवीन 28 जण कोरोना बाधित आढळून आले.

आज दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. यामध्ये गडचिरोली येथील गोकुळनगर येथील एकाचा समावेश आहे. तो हृदयरोगाने ग्रस्त होता. तर शंकरनगर आरमोरी येथील एक जण कोरोनामूळे दगावला आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय बाधितांची संख्या 537 झाली. तर आत्तापर्यंत बाधित 1924 रुग्णांपैकी 1377 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.