तालुका क्रीडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करा

1193

आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याना सुचना

राजुरा

राजुरा, कोरपना व गोंडपिपरी शहरातील क्रीडा संकुलाचे दुरुस्तीचे काम गेली अनेक वर्षा पासून रखडलेले आहे. येथील क्रीडा प्रेमी नागरिक आणि खेळाडूंची मागणी लक्षात घेता येथे सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आमदार सुभाष धोटे यांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी राजुरा येथे बैठक घेऊन तातडीने क्रीडा संकुलांची दुरुस्ती करून युवकांना क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्ताक यांना दिल्या आहेत.
राजुरा शहरालगत सुमारे ५ एकर परिसरात तालुका क्रीडा संकुल आहे. इनडोअर खेळ खेळण्यासाठी मोठे हॉल आहे. मैदानी कसरतीसाठी मोठे मैदान उपलब्ध आहे. परंतु क्रीडा विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याने या संकुलाची देखभाल दुरुस्ती होत नाही. क्रीडा संकुलाचे परिसरात झुडपे व गवत वाढलेले आहे. क्रीडा प्रेमींना व पोलीस प्रशिक्षण भरतीमधील युवकांना तालुक्याचे ठिकाणी सुविधा असूनही याचा लाभ घेता येत नाही. शासनाचे लाखो रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेले जनउपयोगी वास्तू धूळ खात पडलेली आहे. तातडीने क्रीडा संकुलाची दुरुस्ती करून खेळाडू युवकांकरिता संकुल सुरु करण्याबाबतच्या सूचना राजुरा विधासभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्ताक यांना दिल्या आहेत. यामुळे स्थानिक परिसरातील क्रीडा प्रेमी युवकांना विविध खेळ प्रकारात आपले नाव कमावण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विविध खेळ प्रकारांना बळ मिळून क्षेत्रातील क्रीडा प्रेमींना अच्छे दिन पहायला मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.